समस्त शिंपी समाजाचे अखिल भारतीय स्तरावर सर्व पोटजातींचे संघटनात्मक कार्य एक संघाच्या माध्यमातून नुकतेच सुरू झाले असून राष्ट्रीय स्तरावर अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एक संघाची राष्ट्रीय कार्यकारणी घोषित झाली. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्षपदी जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते, युवा उद्योजक व शिवसेना शिंदे गटाचे उपमहानगर प्रमुख प्रमोद शांताराम शिंपी तसेच महाराष्ट्र राज्य युवक सचिव पदी शिंपी समाजाचे युवा कार्यकर्ते व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा युवाधिकारी अमित संजय जगताप यांची प्रदेश युवक सचिव पदी निवड करण्यात आली. जळगाव शहरातून या दोन युवा नेतृत्वांची निवड झाल्याबद्दल सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व स्तरातून त्यांच अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अखिल भारतीय शिंपी समाजाध्यक्ष वनेश खैरनार ,जळगाव शहर अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे, विवेक जगताप, मनोज भांडारकर, अनिल खैरनार, चेतन खैरनार, मुकुंद मेटकर, राजेंद्र बाविस्कर, सुरेश सोनवणे, जितेंद्र शिंपी यासह असंख्य सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अखिल भारतीय क्षत्रीय नामदेव एकसंघचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेशजी ढवळे साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले व महाराष्ट्रभर संगठन उभे करण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी संत नामदेव महाराजांचे वंशज गुरूवर्य महादेव महाराज, मुकुंद महाराज, एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, केदार महाराज हे उपस्थित होते.

Social Plugin