तालुक्यातील पुरमेपाडा व आर्वी वन विभागात रेती ,मुरुम ,माती ,डिझेल , पेट्रोल,काळे डांबर असे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहेत ते तात्काळ बंद करावे,या अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी ,अशी मागणी करीत एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने जिल्हाप्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की , पुरमेपाडा, आर्वी वन विभागाच्या शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून रेती माफिया डांबर माफिया, मुरुम , माती , डिझेल, पेट्रोल असे अनेक प्रकारचे दोन नंबरचे अवैध धंदे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या व महसूल, तलाठी , मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत या रेतीमाफीयांनी वन विभागाचे जंगलात त्यांचा अवैध धंद्यांचा अड्डा बनवला आहे. फॉरेस्टच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात रेती साठवून ठेवली आहे.डिझेल , पेट्रोल, काळे डांबरचे ड्रम मोठ्या प्रमाणात वन विभागातील माती उचलून आपला व्यवसाय जोरात चालू केला आहे. त्याचबरोबर नॅशनल हायवे चालू असलेल्या कामावर शासनाची कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता वन विभागातील मुरुम चोरी करून शासनाचे फसवणूक करत आहेत.यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ होत आहे.या सर्व लोकांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून संबंधीतांना दोषी व ज्यांच्या हद्दीमध्ये हे धंदे चालू आहेत.त्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ सेवा मुक्त करून निलंबित करावे,अशी मागणी विश्वनाथ सोनवणे, राजेंद्र गायकवाड, देवचन सोनवणे, भावडू जाधव, बाळु बाबुलाल ,संतोष गायकवाड, प्रविण गायकवाड,शिवदास सोनवणे, बाबा जाधव,चंदू ढवळे,साहेबराव माळीच , ओंकार जाधव,भास्कर जाधव,नंदू माळीच , विठ्ठल आंबेकर , सजन सोनवणे,सोपान जाधव,राजेंद्र आंबेकर, आदींनी केली आहे.

Social Plugin