गोगादेवजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आलेल्या मिरवणूकांचे सूरज पवार मित्रपरिवारातर्फे जंगी स्वागत

 


मेहतर वाल्मिकी समाजाचे आराध्य देवत श्री जाहरवीर गोगादेव चौहान व श्री रत्नावीर जी चांवरिया महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त सुरज पवार मित्र परिवाराच्या वतीने रविवारी 17 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यात महाप्रसाद,  तसेच ज्यूस वाटपाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता, यावेळी सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार यांच्या मार्फत फुले मार्केट येथे स्वागत स्टेज उभारण्यात आले होते. यावेळी येणाऱ्या मिरवणूकीचं तसेच मिरवणुकीत सहभागी झालेल्या समाज बांधवांचे सुरज पवार यांनी स्वागत केले.

कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील धावती भेट दिली, याप्रसंगी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, गोदावरी फौंडेशनच्या संचालिका केतकीताई पाटील, समाजसेवक सागर सपके, समाजसेविका रूपालीताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी 

पवन घुसर विक्रम सारवाण, लखन सारवाण, सोनू सारवाण सुरज सारवाण, अर्जुन पवार, राहुल पवार, रोहित पवार,  सुरज पवार मित्र परिवाराचे सहकार्य लाभले.