कामाच्याच जागी चोरी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली असून, ओम रामेश्वर पोपटकर, वय- २० वर्षे, रा- वाघ नगर, जळगाव, २) रोहित उर्फ रोहन भिकन मराठे, वय २२ वर्षे, रा- कासमवाडी, जळगाव,सागर धर्मेंद्र सपकाळे, वय १९ वर्षे, रा वाघ नगर, जळगाव अशी तिघा चोरट्याचीं नावे आहेत..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 15 ऑगस्ट 2025 रोजी रात्री एम.आय.डी.सी., परिसरातील स्पेक्ट्रम इंडस्ट्रिज या कंपनीतुन काही अज्ञात इसमांनी कंपनीतील ४०,०००/- रुपये किंमतीच्या कॉपरच्या पट्टया चोरी केल्या होत्या म्हणुन सदर बाबतीत स्पेक्ट्रम कंपनीचे मॅनेजर बाळु गोवर्धन पाटील, रा- सुनंदनी पार्क जवळ, खेडी रोड, जळगाव यांनी अज्ञात इसमांविरुद्ध फिर्याद दिल्याने एम.आय.डी.सी. पो.स्टे. लो गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरची चोरी ही कंपनीत काम करणारे १) ओम रामेश्वर पोपटकर, वय- २० वर्षे, रा- वाघ नगर, जळगाव, २) रोहित उर्फ रोहन भिकन मराठे, वय २२ वर्षे, रा- कासमवाडी, जळगाव, ३) सागर धर्मेंद्र सपकाळे, वय १९ वर्षे, रा वाघ नगर, जळगाव यांनी केली असलेबाबतची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संदीप पाटील सो, यांना मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर तीन्ही इसमांना ताब्यात घेतले होते व त्यांची चौकशी करता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली होती म्हणुन त्यांना पुढील कारवाईकामी एम.आय.डी.सी. पो.स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक, महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संदीप पाटील, पो.उप निरी. शरद बागल, सफौ. अतल वंजारी, पो.हे.कॉ, विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, प्रविण भालेराव, किशोर पाटील, राहुल रगडे, उदय कापडणे, मुरलीधर धनगर, सिद्धेश्वर डापकर अशांनी केली असुन आरोपी मजकुर यांना मा. न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास एम.आय.डी.सी. पो.स्टे.चे पो.हे कॉ रामकृष्ण पाटील, हे करीत असून आरोपी मजकुर यांचेकडुन अजुन अशाच प्रकारचे चोरी सदरखालील गुन्हे केली असल्याची शक्यता आहे.

Social Plugin