रायसोनी नगरात पोलीस गस्त वाढवा रिपाईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

 


जळगावात विशिष्ट चड्डी गँगणे धुमाकूळ घातला असून शहरातील रायसोनी नगर परिसरात एकाच दिवशी चार ठिकाणी या गँगणे चोरी केली केल्याची घटना घडली आहे त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले असून, रायसोनी नगर विस्तारित भागात पोलीस गस्त वाढविण्यात यावी, अश्या मांगणीचे निवेदन रिपाई आठवले जळगाव महानगरच्या वतीने पोलीस अशिक्षकांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, 

जळगाव शहरातील उच्चभ्रू परिसर असलेला रायसोनीनगर या भागात चोरीचे प्रमाण वाढले असून, याठिकाणी पोलीस गस्त वाढविण्यात यावी. तसेच

रायसोनीनगर या भागात वन उद्यान लांडोरखोरी ऑक्सिजन पार्क यासह शांत परिसर असल्याने मोठ्या प्रमाणात विस्तारीत भाग वाढत आहेत. त्यामुळे चोरट्यांचे याभागात चोरी करण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे,  येथील भागातील काही चोऱ्या समोर आल्या काही चोऱ्या समोर आल्या नाही, चड्डी गैंग या चोरट्यांनी या परिसरात धुमाकूळ घातला असून,  श्री गजानन महाराज यांच्या मंदिरात चोरी करून ऐवंज लुटून नेला आहे. इतर ठिकाणी देखील या गँगणे चोरी केली आहे.  चोरटे हे शस्त्रधारी असल्याने रायसोनी नगर भागातील नागरीकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे  याठिकाणी दिवसाची आणि रात्रीची पोलीस गस्त वाढवावी तसेच बिट मार्शल वाढवावे अशी मागणी रिपाई आठवले गटाकडून करण्यात आली आहे. यावेळी महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, किरण अडकमोल, नरेंद्र मोरे, मनोज अडकमोल आदी उपस्थित होते.