जळगाव – कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे 45 वे अधिवेशन येत्या 1 ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर येथे भव्यदिव्य पद्धतीने पार पडणार असून, या अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी जळगाव येथील अजिंठा विश्रांम गृहात नुकतीच पूर्वतयारी सभा पार पडली.
या सभेचे अध्यक्षस्थान नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे यांनी भूषविले. विविध विषयांवर सविस्तर चर्चा करताना सभासद नोंदणी, अधिवेशन लढा निधी संकलन, ठराव मंजुरी तसेच नाशिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांचा अधिवेशनात ठराव घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात ज्येष्ठ सल्लागार आर. जी. राणे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत अधिवेशन यशस्वी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास सोनवणे (जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब वन कर्मचारी संघटना) यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश अडकमोल (जिल्हा कार्याध्यक्ष) यांनी मानले.
या अधिवेशनात सेवाविषयक ठरावांसह विविध मागण्यांचा ठराव सादर होणार असून, राज्यभरातील कर्मचारी वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी हा अधिवेशन ऐतिहासिक ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी रवींद्र तायडे नाशिक विभागीय अध्यक्ष, आर. जी. राणे ज्येष्ठ सल्लागार, योगेश अडकमोल जिल्हा कार्याध्यक्ष, विकास सोनवणे जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब वन कर्मचारी संघटना, युवराज तेली कार्याध्यक्ष, वन कर्मचारी संघटना, राकेश निकुंभे सचिव, वन कर्मचारी संघटना, रोहित पावरा उपाध्यक्ष, वन कर्मचारी संघटना, सचिन सपकाळे जिल्हाध्यक्ष, जलसंपदा विभाग, जिभाऊ हटकर सचिव, जलसंपदा विभाग, नंदकुमार गायकवाड कार्याध्यक्ष, मनपा विभाग
महेश सपकाळे, रावसाहेब, सुरेश महाले दादा, भास्कर घुले दादा,भीमराव देसले दादा, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Social Plugin