जळगाव – क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत दरवर्षी आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नुकत्याच धुळे येथे पार पडलेल्या विभागीय वूशू स्पर्धेत पोलिस वर्गातील कराटे खेळाडू मनस्वी तायडे यांनी सुवर्णपदक जिंकून सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. राज्यस्तरीय वूशू स्पर्धा ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान संभाजीनगर गोवरखेडा येथे होणार आहे.
त्याचबरोबर शालेय कराटे व स्केटिंग स्पर्धेतही अनेक खेळाडूंना विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड मिळाली आहे.
कराटे निवडलेले खेळाडू:
कौस्तुभ जंजाळे, कार्तिक शिंदे, महेश वाघ, श्रेयस परदेशी, कुणाल बाविस्कर, नितीश भोसले, संकेत पवार, अदिती खंगार, आराध्या तोडा, नेहा आहिरराव, मानसी सूर्यवंशी, निशू कोळी, प्राची पाटील, मानवी पाटील, साक्षी बाविस्कर, प्रांशी सोनवणे, मनस्वी तायडे
स्केटिंग निवडलेले खेळाडू:
कार्तिक चौगले, कौस्तुभ चौगले, श्रवण महाले, मानसी चौधरी, तेजल सूर्यवंशी, मानसी सूर्यवंशी
सर्व विजयोत्सव खेळाडूंना जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधीक्षक अरुण आव्हाड, पोलिस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे, पोलिस निरीक्षक संदीप पाटिल, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यासोबतच खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून अश्विनी निकम, जागृती काळे, राजेंद्र जंजाळे, स्वप्नील निकम, प्राजक्ता सोनवणे, प्रथमेश वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.
जळगाव पोलिस दलाच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा राज्यस्तरीय स्पर्धेत आपले कौशल्य सिद्ध केले असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांचे अभिनंदन!




Social Plugin