“वासुमित्रा फाउंडेशनच्या वतीने रक्तदानातून शिवजयंती साजरी; 52 जणांचा सहभाग”

जळगाव | प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वासुमित्रा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास यावर्षीही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या कार्याला अभिवादन करत समाजासाठी प्रेरणादायी विचार मांडले.

मागील वर्षाप्रमाणे यंदाही या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रक्तदान शिबिरात एकूण 52 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. रक्तदानासारख्या महान कार्यात युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष श्री वासुभाऊ सोनवणे, नगरसेवक श्री गणेश भाऊ सोनवणे, वासुमित्रा फाउंडेशनचे अध्यक्ष भूषण सोनवणे, उपाध्यक्ष जयेश पाटील, तसेच शशिकांत पाटील, श्रीकांत सोले, संदीप येवले, प्रशांत सोनवणे, उद्योजक सागर भाऊ पाटील, मनोज निंबाळकर, बबलु सपकाळे, योगेश सोनवणे, केतन सोनवणे, विनोद ढमाले, देवेंद्र मराठे, शुभम बोदडे, गितेश पवार, मारुती माळी, हेमंत रोकडे, योगेश निंबाळकर, निलेश निंबाळकर, गोलू सोनार, सचिन डोळे, मिलिंद सोनवणे, मयूर सोनवणे, पवन सोनवणे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन वासुमित्रा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केले. रक्तदानाच्या माध्यमातून समाजात मानवतेची भावना वृद्धिंगत व्हावी आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक एकात्मता आणि सेवाभाव वाढीस लागला असून, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.