भाजपा कार्यालय (निर्मिती फाऊंडेशन) मोहाडी रोड येथे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व माल्यार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी मंडळ अध्यक्ष श्री. अजित दादा राणे, जिल्हा सरचिटणीस श्री. राहुल दादा वाघ, नगरसेवक श्री. नितीन भाऊ सपके, नगरसेविका सौ. वैशाली ताई पाटील, नगरसेविका सौ. सुरेखा ताई तायडे, श्री. महेश कापूरे, रमेश चौधरी, मिलिंद चौधरी, उमेश गवळी, बाळू पाटील, हर्षल सोनवणे, रोहीत सोनवणे, रविंद्र चौधरी, आशुतोष मानिवाल, विनायक जोशी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्याचा व विचारांचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम शांत व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Social Plugin