जळगाव (प्रतिनिधी) – स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती जळगाव येथे विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत घरकुल योजनेचे प्रलंबित हप्ते तातडीने वितरित करण्याचे कडक निर्देश देण्यात आले.
ग्रामीण विकास, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, वित्त आयोग निधी, सिंचन विहीर व गाय-गोठा अनुदान योजनांचा सविस्तर आढावा घेऊन लाभ वेळेत व पारदर्शक पद्धतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याचेही आदेश देण्यात आले.
यावेळी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या प्रगतीबाबत विश्वास व्यक्त करण्यात आला.
तसेच महिला बचत गटांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देत, प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य व बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या. महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी प्रशासनाने सक्रिय भूमिका घ्यावी, असेही सांगण्यात आले.
या बैठकीमुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळून ग्रामीण भागातील नागरिकांना लवकरच लाभ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Social Plugin