एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्ड वरील गुन्हेगारावर एम.पी.डी.ए.ची कारवाई करण्यात आली असून, संतोष ऊर्फ बब्या सुभाष राऊत (कोळी) वय २४ रा. आयटीआय जवळ, कुसूंबा असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याबबत सविस्तर माहिती अशी की, संतोष ऊर्फ बब्या सुभाष राऊत (कोळी) वय २४ याचे विरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात ०९ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी अवैध गावठी हातभट्टी दारू विक्रीचे सात गुन्हे दाखल आहेत. त्याचा कुसुंबा येथील बसस्टॅन्ड जवळ गावठी हातभट्टी विक्रीचा अड्डा होता. तेथून तो गावठी हातभट्टी दारूची विक्री करत असे. त्यामुळे गावातील तरुण मुलं मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात असल्याने त्यांचे भविष्य हे धोक्यात आले होते.
पोलिसांनी वेळोवेळी त्याच्या अड्ड्यावर छापा टाकून प्रतिबंधक कारवाई केली होती. परंतु त्याने त्याचा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरूच ठेवला होता. बब्या याची कुसुंबा गावात दहशत होती तो "हातभट्टीवाला" व धोकेदायक या संज्ञेत असल्यामुळे त्याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध होणे कामीचा प्रस्ताव एमआयडीसी पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक, जयपाल माणिकराव हिरे यांनी पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्याकडे पाठवला होता. त्याप्रमाणे प्रस्तावाचे अवलोकन करून सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 29 संप्टेंबर रोजी बब्या यास स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले आहेत. बब्या यास पो.उ.नि दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ. गफ्फार तडवी, पो.ना. सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर साळवे, इमरान सय्यद पोकों, साईनाथ मुंडे, संदिप धनगर अशांनी कुसुंबा येथून ताब्यात घेतले होते. त्याची आज रोजी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलीस नाईक किशोर पाटील, छगन तायडे,किरण पाटील यांनी औरंगाबाद कारागृह येथे रवानगी केली आहे.


Social Plugin