भुसावळ शहरात धारदार शस्त्राने तरुणाची हत्या करण्यात आली असून भुसावळ शहरात कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा खून झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात महादेव मंदिरा जवळ पूर्व वैमनस्यातून रविवारी नाजीर शेख नशीर ( वय ३१) या तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या छातीत चाकूने वार झाल्याचे दिसत असून हातावर वार आहेत. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला तात्काळ जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्याला तपासणी अंती मृत घोषीत केले. मयत नाजीर शेख नाशिर याच्या आप्तांनी जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात आक्रोश केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.


Social Plugin