१३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण.

 


धरणगावं तालुक्यातील हिंगोली गावातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून अपहरण केल्याची घटना रविवार २२ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. या संदर्भात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,धरणगाव तालुक्यातील हिंगोली गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवार २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी झोपलेली असताना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत पोस्ट लावून पळून नेत अपहरण केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुरुवार २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल खुशाल पाटील करीत आहे.