धुळे महानगरपालिका क्षेत्रात प्रचंड प्रमाणात अस्वच्छता पसरली असून विविध साथरोंगाचा प्रादुर्भाव वाढला आहे . स्वच्छता विभाग आणि आरोग्य विभाग कुचकामी झाली असून रोगराई रोखण्यात व स्वच्छता ठेवण्यात स्पेशल अपयशी ठरली आहे . सद्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. मात्र शहरवासी साथीच्या आजाराने हैराण झाले आहेत. डेंग्यूचा वाढता प्रादुर्भावामुळे आरोग्य धोक्यात आले असून महानगरपालिकेतर्फे प्रतिबंधात्मक कोणतीही उपाय योजना केली जाताना दिसत नाही. त्यामुळे साथीचे आजार तसेच डेंग्यूवर युध्यपातळीवर वैद्यकीय उपाय योजना करावी.त्याच प्रमाणे शहरातील विविध कॉलनी मध्ये अस्वछता पसरली आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने रोगराई वाढत आहे. त्यामुळे दररोज घंटागाडीने कचरा उचलला जावा, तसेच साफसफाई दररोज घंटागाडीने कचरा उचलला जावा, तसेच साफसफाई दररोज केली जावी, दरम्यान धुळे महानगपालिका क्षेत्रातील खाजगी तसेच महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागांवर काटेरी झाडे झुडपे, गवताचे जंगलच निर्माण झाले आहे. त्यामुळे डास ,मच्छर , रोगराई पसरविणारे कीटक वाढले आहेत. म्हणून मोकळ्या जागांवरील झाडे झुडपे, गवत काढून साफसफाई व्हावी ही विनंती. तसेच धुळे शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून नागरिक वाहनधारक हैराण झाले आहेत. अनेक वेळा छोटे-मोठे अपघातही होत असतात. त्यामुळे शहरातील व कॉलन्यामधील रस्त्यांचीही तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. धुळे शहरात अद्यापही आठ ते दहा दिवस नळांना पिण्याचे पाणी येत नाही. त्यामुळे शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. म्हणून सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार दररोज अथवा एक दिवसाआड पिण्याचे पाणी द्यावे असे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ अनिल भामरे , पितांबर भामरे, विलासराव पाटील, रवींद्र चौधरी, सलमान मिर्झा, मधुकर मरसाळे, रिजवान अन्सारी, ताहीर खाटीक, दीपक पाटील, किशोर देसले, लहू पाटील, फैजल अन्सारी, जावेद देशमुख , हरिभाऊ अजळकर , अक्काबाई बिराडे, किरण बापू नगराळे, प्रकाश महाले, बानूताई शिरसाठ, दीपक गवळे, कैलास पाटील आदी उपस्थित होते.

Social Plugin