मनपा उर्दू शाळांमध्ये शिक्षकांची पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टल वर जाहिरात द्यावी- मुस्लिम शिष्टमंडळाचे आयुक्त व प्रशासन अधिकारी यांना साकडे


शासन निर्णय ७ फेब्रुवारी १९, तसेच १० नोव्हेंबर १९ व शासन निर्णय १३ऑक्टोबर २३ तसेच संचालनालयाचे २७ ऑक्टोबर २३ च्या पत्रानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदावर भरती पवित्र या संगणकीय प्रणाली द्वारे करण्यात येत असल्याने मनपा उर्दू शाळांमध्ये सुमारे २० ते २५ शिक्षकांची पदे रिक्त असल्याने ती पदे भरण्यासाठी २७ ऑक्टोबर च्या परिपत्रकानुसार पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यात यावी या आशयाचे निवेदन जळगाव शहरातील मुस्लिम समाजातील विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मनपा सह आयुक्त  अभिजीत बाविस्कर व मनपा प्रशासन अधिकारी तथा जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी श्रीमती माधुरी पाटील यांना निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.


 शिष्ट मंडळात यांचा होता समावेश

मनीयार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, कुल जमातीचे अध्यक्ष सैयद चांद, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक अध्यक्ष मजहर खान, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अमजद खान, वरिष्ठ पत्रकार अंजूम रजवी,बेलदार 

बिरादरीचे अध्यक्ष नूर खान बेलदार, इमदाद फाउंडेशनचे मतीन पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजा मिर्झा, एंजल फूड चे दानिअल शेख व साबीर इमदाद आदींची  उपस्थिती होती.

प्रशासन अधिकारी श्रीमती माधुरी पाटील यांना निवेदन देताना अमजद पठाण व सैयद चांद सह फारुख शेख, मतीन पटेल नूरखान साबीर ईमदाद आदी दिसत आहे