सामाजिक कार्यकर्ते राजू भाऊ साळुंखे यांचा वाढदिवस आज १ डिसेंबर रोजी शहरातील संत गाडगे बाबा निवारा गृह येथे साजरा करण्यात आला.वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस असतो, आपल्या वाढदिवशी इतर वायफळ खर्च नकरता, सामाजिक बांधिलकी जपत, राजू भाऊ यांनी संत गाडगे बाबा निवारा गृह येथे फळ वाटून आपला वाढदिवस साजरा केला.राजू भाऊ साळुंखे हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजिक कार्य करीत असून त्यांनी अशा अनेक संस्थांना आर्थिक मदत केली आहे. यातून त्यांनी युवका समोर एक आदर्श ठेवला आहे. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांनी आपली आई नंदाबाई भीमराव साळुंखे यांच्या हस्ते फळ वाटून वाढदिवस साजरा केला यावेळी समस्त साळुंखे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Social Plugin