अक्कलपाडा प्रकल्पातून धुळेकरांना दोन दिवसांआड सुरू झालेला मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठ्याचा आजचा दिवस धुळे शहराच्या दृष्टीने सुवर्णाक्षरांत नोंदविण्यासारखा आहे. धुळेकरांना रोज आणि मुबलक पाणी देण्याचा दिलेला शब्द आम्ही पाळला आहे आणि वर्षानुवर्षे पाणीटंचाईमुळे त्रस्त धुळेकरांना आम्ही दिलासा दिला आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज केले.
धुळेकर जनतेसाठी अक्कलपाडा येथील प्रकल्पातून १७० कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण आज पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण झाले. या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करत केंद्र सरकारकडून १७० कोटी रुपयांचा निधी आणत धुळेकरांना दिलेल्या वचनाची पूर्ती करणारे खासदार डॉ. सुभाष भामरे अध्यक्षस्थानी होते. धुळ्याच्या महापौर प्रतिभाताई चौधरी, धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, भाजपचे प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष देवरे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता,पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे ,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर प्रदीप कर्पे, माजी महापौर जयश्री अहिरराव, उपमहापौर वैशाली वराडे, स्थायी समितीच्या सभापती किरण कुलेवार, भाजपच्या गटनेत्या वालीबेन मंडोरे, सभागृह नेत्या भारती माळी, विरोधी पक्षनेत्या कल्पना महाले, सभापती सारिका अग्रवाल, विमल पाटील, नगरसेवक हिरामण गवळी, आयुक्त अमिता दगडे-पाटील, भाजपच्या उद्योग आघाडीचे प्रदेश सहसंयोजक उत्कर्ष पाटील, किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती कामराज निकम, जिल्हा परिषदेच्या सभापती धरती देवरे, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, हनुमंत वाडीले,, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Social Plugin