रोटरी क्लबच्या कार्याची पत्रपरिषदेत दिली माहिती.
रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. शासनासह समाजातील विविध घटकांच्या माध्यमातून आलेल्या मागणीनुसार रोटरी क्लब विविध साधनांच्या रूपाने गरजूंपर्यंत सेवा व मदत देण्याच्या कामात रोटरी क्लब ही स्वयंसेवी संस्था सातत्याने पुढाकार घेवीं काम करीत असल्याची माहिती रोटरी क्लब ३०६० चे प्रांतपाल मिहीर दवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
दवे पुढे म्हणाले की, १ जुलै ते ३० जून या माझ्या कार्यकाळात समाजात कोणकोणत्या मुद्द्यांवर काम करावे याचे संपूर्ण नियोजन करून वेगवेगळ्या स्कीम्स राबविण्याचा प्रयत्न होत आहे. आज २० हॉकर्सना व्यवसायाकरिता मोठ्या व्यावसायिक छत्री भेट देण्यात आल्या. आगामी काळात संपूर्ण शहरात ५०० छत्र्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. गरजू रुग्णांच्या डायबेटिज तपासणी करण्यात आल्या. आतापर्यंत रोटरी क्लबने स्वच्छता, आरोग्य, सोलर सिस्टीम प्लॅन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गोबर गॅस, कॅन्सर जनजागृती, शिलाई मशीन वाटप, पोलिओ ड्रॉप्स जनजागृती व लसीकरण, शाळांना शालेय साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना वह्या वाटप अशी अनेक समाजसेवेची भरीव कामे केली असून ही सामाजिक कार्याची परंपरा सातत्याने सुरु आहे. यापुढे व्होकेशनल ट्रेनिंगच्या माध्यमातून गरजूना मदत केली जाणार आहे. ऑटिझम सेंटरच्या प्रस्तावावर काम सुरु आहे. 'रोव्हर बिल्डकॉन' हा रोटरीच्या सर्वात मोठा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जात असतो. कोरोनाच्या काळात रोटरीने आपले ४० सदस्य गमावले. या काळातही रोटरीचे काम थांबले नव्हते. सामाजिक उत्तरदायित्व निभावत मास्क वाटप, व्हॅगसिनेशन, ऑक्सिजन पाईपलाईन, व्हेंटिलेटर, डिजिटल एक्सरे मशीन इत्यादी सेवा पुरविण्यात आल्या. धुळे तालुक्यातील गोंदूर गावाजवळ आदिवासी वस्तीत पाणीपुरवठा पाईपलाईन करून या परिसरास इनरव्हील ग्राम असे नाव देण्यात आले. रोटरी क्लबच्या धुळे युनिटने तालुक्यातील नरव्हाळ हे गाव दत्तक घेतले असून गावात विविध सोयीसुविधा उपलब्ध करून गाव स्वावलंबी बनविण्याचा संकल्प आहे असे सांगून रोटरीच्या विविध प्लॅटफ़ॉर्म्सबद्दल व विंग्सबद्दल सविस्तर माहिती मिहीर दवे यांनी दिली. पत्रकार परिषदेला रोटरी क्लबच्या फर्स्ट लेडी वैशाली दवे, अध्यक्ष दीपक जैन, सेक्रेटरी विलास कोठावदे, माजी अध्यक्ष राजेश वाणी, आशुतोष जोशी, पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.

Social Plugin