स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गेचा पुतळा जाळून भाजपकडून निषेध .



‘ने मजसी ने परत मातृभुमीला, सागरा प्राण तळमळला’ ह्या  स्वत: लिहलेल्या काव्य पंक्ती नुसार संपुर्ण आयुष्य देशासाठी समर्पीत करणाऱ्या थोर देशभक्त, स्वातंत्र वीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रियांक खर्गेच्या पुतळ्याचे दहन भाजपा, भा.ज.यु.मो. व भा.ज.पा. महिला मोर्चाच्या वतीने महापालिका प्रवेशद्वारा सामोर करण्यात आले. 

भ्रष्टाचाराने बरबटलेल्या, देशाविषयी यत्कीचंतही निष्ठा व प्रेम नसलेल्या सध्याच्या काँग्रेसचे राष्ट्रीयअध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांच्या कुपुत्राने, प्रियांक खर्गेने थोर देशभक्त स्वातंत्र वीर सावरकरांबाबतीत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा जोरदार निषेधाच्या घोषणा देऊन व त्यांच्या पुतळ्याला जोडे चपलांचा भडीमार करीत त्याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. हे निषेध आंदोलन भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष आकाश भाऊ परदेशी यांच्या नेतृत्त्वात व धुळे लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार मा. डॉ. बाबासाो सुभाषजी भामरे व भाजपा महानगर अध्यक्ष श्री. गजेंद्र अंपळकरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. देशविरोधी शक्तीची पाठ राखण करणाऱ्या व आतंकवाद रोखण्यास अयशस्वी ठरलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना खरी देशभक्ती कळलीच नाही. त्यामुळेच काँग्रेसचे नेते अशी विधाने करीत असतात, व देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या थोर देशभक्त राष्ट्रपुरषांविषयी मुक्ताफळे उधळुन अपमान करीत असतात. त्यांच्या वक्तव्याचाआम्ही तीव्र निषेध करीत असल्याची प्रतीक्रीया भा.ज.पा. महानगर अध्यक्ष  गजेंद्र अंपळकरांनी या प्रसंगी दिले. 

या आंदोलनात  धुळे लोकसभा मतदार संघाचे प्रमुख माजी आमदार बाबासाो राजवर्धनजी कदमबांडे, महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी, माजी महापौर चंदुबापु सोनार, ज्येष्ठ नेते  हिरामण आप्पा गवळी,  प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ. जयश्रीताई अहिरराव, स्थायी समीती सभापती सौ. किरणताई कुलेवार, म.न.पा. सभागृह नेत्या भारतीताई माळी, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. वैशालीताई शिरसाठ, माजी उपमहापौर सौ. कल्याणीताई अंपळकर, महानगर सरचिटणीस जितेंद्र चौवटिया,  ओमप्रकाश खंडेलवाल, , महानगर उपाध्यक्ष  संजय बोरसे, मुनाआप्पा शितोळे,राजेंद्र खंडेलवाल, जिल्हा प्रवक्ते  पृथ्वीराज पाटील, .सुनिल कपिल,  अमोल ढापसे.  ॲड. किशोर जाधव,  रवी मगरे,  विनोद खेमणार,  पंडितराव मदणे,  भागवत चितळकर,  विजय पवार,  विजय जाधव,   भगवाण देवरे,  गणेश चौधरी, ओ.बी.सी. मोर्चा जिल्हाध्यक्ष  दिनेश बागूल,मंडल अध्यक्ष ईश्वर पाटील,  बंटी धात्रक,  सुबोध पाटील,  भिलेश खेडकर,  बबन चौधरी,  अरुण पवार, अमोल मासुळे, अनिल थोरात, नरेश गवळी, नरेश हिरे,  महिला मोर्चा सरचिटणीस सौ. मोहिणी धात्रक, संगिता राजपुत, वैभवी दुसाणे, नेहा अहिरराव, मिनल अग्रवाल, वंदना विश्वकर्मा, रंजना पाटील, पुष्पा सातपुते, छाया पाटील, हिमानी विश्वकर्मा ,युवा मोर्चा सरचिटणीस  पंकज धात्रक,  सचिन पाटील, विनय बेहेरे, हर्षल बोरसे, मयुर गवळी, आदर्श पोलादे, राहुल गावडे, प्रितेश अग्रवाल, प्रेम वराडे, सोमनाथ अहिरे, निलेश गिळे, किरण पाटील, जयेश पिंगळे, विनायक करनकाळ, दिपक धनगर, कुणाल वाघ, करण लोंढे, विजय पाटील, सागर परदेशी, सुहास भाउु अंपळकर, सहप्रसिध्दी प्रमुख अनिल सोनार, महानगर कार्यालय प्रमुख  प्रकाश उबाळे. सुरेश अहिरराव, सुनिल विसपुते,   पवन जाजू  पंकज विंचु रितीक राजपुत, इकबाल पटेल, आकाश ढापसे. इत्यादी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.