दरोड्यातील आरोपीला गावठी कट्ट्यासह एलसीबीने पकडले.

 


 दरोडा खंडणीसह गंभीर गुन्ह्यांची पोलिस दप्तरी नोंद असलेल्या चितोड रोड भागातील तरुणाला गावठी कट्ट्यासह मयुर कंडारे याला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. सोनगीर ता.धुळे गावच्या शिवारात हॉटेल स्वागत जवळ मयुर उर्फ बबुवा सुरेश कंडारे रा.अहिल्यादेवी नगर,चितोड रोड,धुळे हा तरुण दहशत माजविण्याच्या इराद्याने गावठी पिस्तुलसह फिरत असल्याची माहिती एलसीबी पीआय दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने सोनगीरच्या  हॉटेल स्वागत जवळ जावून मयुर कंडारे अंग झडतीत त्याच्याकडे ४२ हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्तुल, दोन जीवंत काडतुसे आढळून आली. मुयरी कंडारे विरुध्द आझाद नगर, चाळीसगाव रोड आणि शहर पोलिसात दरोडा,जबरी चोरी, अवैध शस्त्र,खंडणी अशा गंभिर गुन्ह्यांची नोंद आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाने एलसीबी पीआय दत्तात्रय शिंदे, पीएसआय प्रकाश पाटील, एएसआय शाम निकम,हे कॉ. सुरेश भालेराव, पोना रविकिरण राठोड, पो कॉ. निलेश पोतदार, सुशील शेंडे, जितेंद्र वाघ, सागर शिर्के, हर्षल चौधरी, गुणवंतराव पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.