आजपासून धुळ्यात रमाबाई आंबेडकर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

 


मागील वर्षापासून संपूर्ण धुळे जिल्ह्यात लोकप्रिय असणाऱ्या रमाबाई आंबेडकर चषक प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा ह्या वर्षी देखील अगदी दिमाखात धुळे शहरातील नेताजी मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. आज ह्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.



सात फेब्रुवारी रोजी माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येते. सदर क्रिकेटचे सामने हे दिवसात खेळवण्यात येणार असून दररोज होणाऱ्या सामन्यादरम्यान आकर्षक अशी बक्षिसे समाधान बैसाने व नयनाताई दामोदर यांच्या मार्फत देण्यात येणार आहे. यावर्षी देखील अनमोल दामोदर, विशाल बैसाने, बबलु चत्रे, अजिंक्य सूर्यवंशी, मंथन निकम, अनिकेत दामोदर, रवी डोंगरे यांनी या स्पर्धेसाठी अथक प्रयत्न केले. आज पासून सुरू झालेली ही स्पर्धा 7 फेब्रुवारी पर्यंत उत्साहात पार पडणार असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष नयना दामोदर म पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष समाधान बैसाणे यांच्याकडून आकर्षक असे रोख बक्षीस या स्पर्धेदरम्यान देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली.


आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात, नागसेन बागुल, गौतम पगारे, मनीबाबा खैरनार, नागिंद मोरे, सिध्दार्थ वाघ, सागर मोहिते, विशाल साळवे, बापू अहिरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.