पाचोरा तालुक्यातील अंतुरली खुर्द या गावातील २७ वर्षीय जुबेर खान हनीफ खान यांचे अमानुषपणे किरकोळ कारणावरून डोक्यावर फरशी मारून गंभीर जखमी केले त्यात तो चार दिवस मृत्यूशी झुंज देत होता व पाचव्या दिवशी १६ फेब्रुवारी रोजी तो मरण पावला. त्यामुळे २ महिन्याची ईकरा,२ वर्षाचा जोहान व ३ वर्षाची जीकरा यांचे पितृत्व हरवले तर पत्नी तब्बस्सुम ला २३ व्या वर्षीच वैधत्व प्राप्त झाले व म्हातारे आई वडिलांचा आधार गेला.
जुबेर व गुन्ह्याची थोडक्यात हकीगत
अंतूर्लि या गावात आपले आई-वडील मोठा भाऊ व त्याचे कुटुंबीय व स्वतःचे कुटुंबीय असे एकत्रित राहत होते जुबेर ला तीन अपत्य तर त्याचा भाऊ शाहरुखला सुद्धा तीन मुलं या अत्यंत गरीब परंतु सुखी संसाराला कोणाची नजर लागली व १२ फेब्रुवारी रोजी जुबेर व त्याचे वडील मजुरीने कापसाची गाडी भरत असताना दुसऱ्या गाडी मालकाने वाद करून जुबेर व त्याच्या वडिलांना मारहाण केली एवढ्यावरच न थांबता नाना पाटील व राहुल पाटील या दोघी पिता पुत्रांनी जुबेर ला फरशी व टॉमी ने डोक्यावर मारून गंभीर जखमी केल्याने त्यात त्याचा जीव गेला.
पोलीस अधीक्षकांना जळगाव येथील कुलजमाती तर्फे शिष्टमंडळ भेटून त्यांना हकीकत समजावण्यात आली व त्यांनी लागलीच दिनांक १७ फेब्रूवारी रोजी भा द वी ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करून १८ फेब्रुवारी आरोपींना अटक केली.
दुर्दैव असे की १२ फेब्रुवारी ची घटना घडली असताना पोलिसांनी १३ फेब्रुवारी रोजी पाचोरा पो.स्टे.ला गुन्हा नोंदवता भा.द.वी ३०७ ऐवजी फक्त ३२६ च दाखल केला होता. त्याची सुद्धा चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे.
राजकीय व सामाजिक संघटनाची जुबेर च्या कुटुंबीयां कडे पाठ
हत्या झालेल्या जुबेर खान चे कुटुंब उघड्यावर पडले असताना व ज्या गावात जुबेर राहतो तेच गाव सत्ताधारी आमदार व भावी आमदाराचे असताना सुद्धा अद्याप कोणीही त्यांच्या कुटुंबीयांना सात्वन देण्यासाठी आले नाही तर मदतीचा प्रश्नच कुठे निर्माण होत नाही? यामुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे की अल्पसंख्यांक समाज हा फक्त मत घेण्यासाठीच असतो का? त्याच्या सुख दुखात राजकीय व सामाजिक व्यक्ती का येत नाही ?
मनियार बिरादरी ने मुलांची शिक्षणाची जवाबदारी सह तातडीची २१ हजाराची केली मदत
२० जानेवारी रोजी संध्याकाळी जुबेर च्या अंतुरली गावी जाऊन जळगाव जिल्हा मनीयार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, वहिदत इस्लामी चे अध्यक्ष अतिक अहमद, कुल जमातीचे अनिस शाह, एंजल फूडचे दानियल शेख, व मिजान फाऊंडेशन चे अध्यक्ष कासिम उमर रफिक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कुटुंबीयांचे सात्वन केले व त्यांच्या वर कोसळलेल्या दुखात सहभागी असल्याचे सांगून त्यांना जे काही सहकार्य लागेल ते करण्याची इच्छा प्रकट केली.
मनीयार बिरादरी तर्फे अध्यक्ष फारुक शेख यांनी कुटुंबीयांना रोख २१ हजार रु चे सहकार्य करून तिन्ही मुलांचे शिक्षणाची जवाबदारी घेतली.यावेळी गावातील सुमारे ५० ते ६० लोकांची उपस्थिती होती.
सामाजिक व राजकीय संघटनांना आवाहन
जूबेर ला जीवेनिशी ठार केल्याने त्याचे कुटुंबीय उघड्यावर पडले असून त्याचे राहते घर गहाण, शेत गहाण, तर महेंद्र फायनान्स चे कर्ज डोक्यावर असल्याने तसेच कुटुंबाचा कर्ता व्यक्ती घरातून गेल्याने संपूर्ण कुटुंब अत्यंत दुःखात असून त्यांना मुख्यमंत्री निधी,आमदार, खासदार निधी व सामाजिक संघटनांनी आर्थिक सहाय्य करावे असे आवाहन जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी एका पत्रका द्वारे केले आहे.

Social Plugin