२३ फेब्रुवारी १९६० साली सातपुड्याच्या कुशीत असलेल्या रावेर तालुक्यातील विवरे गावातील एका शेतकरी कुटुंबात उल्हास वासुदेव पाटील यांचा जन्म झाला. लहानपणापासून कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या डॉ. उल्हास पाटील यांनी स्त्रीरोग तज्ज्ञाची पदवी घेऊन जळगावात वैद्यकीय सेवेस सुरुवात केली. घरात राजकारणाचा गंधही नव्हता. त्यामुळे त्या वाटेला जाणे शक्यच नव्हते; परंतु माजी मंत्री (कै.) बाळासाहेब चौधरी यांच्यामुळे ते सन १९७८ मध्ये तरुण वयातच काँग्रेस पक्षाशी जोडले गेले. सुरुवातीला पुणे जिल्हा युवक काँग्रेस सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. यावेळी त्यांच्यातले नेतृत्वगुण ठळकपणे समोर आले. त्यांनी १९९३ साली त्यांच्या मातोश्री गोदावरी वासुदेव पाटील यांच्या नावे स्वयंसेवी संस्था अर्थात गोदावरी फाउंडेनशची स्थापना केली. सन १९९८ मध्ये काँग्रेसपक्षाने त्यांना लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. ते निवडून देखील आले मात्र त्यांना केवळ १३ महिन्यांची खासदारकी मिळाली. त्यानंतर ते 3 वेळा पराभूत झाले. राजकारणात सक्रिय असतांना सामाजिक कार्य निरंतर सुरु ठेवण्यासाठी त्यांनी
गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल सुरु केले. गोदावरी हॉस्पिटल येथे दररोज सुमारे १००० रुग्णांवर बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि इनडोअरमध्ये उपचार केले जातात.
या हॉस्पिटलमध्ये परवडणाऱ्या सवलतीच्या दरात जळगाव, बुलढाणा, अकोला, बुरहानपूर येथील सर्वसामान्य माणसाला अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच जिल्ह्यात आरोग्य शिबिरे आयोजित करून गरजू रूग्णांवर मोफत उपचार देखील केले जातात. आतां गेल्या काही दिवसांपूर्वी डॉ. उल्हास पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून राजकारण करत असताना माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची सेवा मात्र आजही निरंतर अविरत सूरू आहे."
शरीर आणि मन या दोन्ही पातळ्यांवर रुग्णांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. रुग्णांप्रती त्यांची वागणूक ही अतिशय सौजण्यपूर्वक,नम्र असते. तपासणी करताना ते मानसशास्त्रीय कौशल्याचा उपयोग करीत रुग्णांच्या अंतः्मनाचा ठाव घेतात "रुग्णांच्या आजारा विषयी आवर्जून चौकशी करतात. त्यांना बोलकं करतात .शिस्तबद्द तपासणी करून योग्य कौटुंबिक सल्ला देतात. त्यांच्या उपचाराने वेदना तर संपतातच उलट ते मनोबल वाढवितात. रुग्णांना मोकळा श्वास' घेण्याकरिता आत्मविश्वास निर्माण करतात.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद वाक्य सत्यात उतरवत आरोग्य सेवा निरंतर अविरतपणे सुरु ठेवणारे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना पोलीस चौफेर न्युज परिवार तर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा🎂💐🍫💐🎂🍫💐

Social Plugin