जामनेर तालुक्यातील पेट्रोल पंप मॅनेजरला लुटणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी केले जेरबंद

 

जामनेर तालुक्यातील शाहपुर येथील त्रिवेनी पेट्रोलपंप येथून हिशोबाचे पैसे घेऊन मोटर सायकलने जामनेर कडे येत असलेल्या मॅनेजरला मोटारसायकल आडवी लावून लुटणाऱ्या तिघांपैकी एका आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. ऋषिकेशरमेश मावळे रा. साईसिटी कुसुंबा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, 


गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल 


निलेश रतन पवार रा. जामनेर पुरा है शाहापूर येथील त्रिवेनी पेट्रोलपंप येथे मॅनेजर म्हणून काम करतात 18 फेब्रुवारी 2024 रोजी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास निलेश पवार हे हिशोब करून त्रिवेनी पेट्रोलपंप शाहापुर येथुन मोटारसायकलने जामनेर कडे येत असताना,  जामनेर ते शाहापुर रोडवरील,  बेल फाट्याजवळ लाल रंगाच्या मोटर सायकल वरील तीन अनोळखी इसमानी मोटारसायकल आडवी लावुन,  निलेश पवार यांना चापटाबुक्यानी मारहान करुन, त्यांच्याजवळ असलेले  1 लाख 93 हजार 500 रुपये हिशोबाचे पैसे घेवुन पळुन गेले होते.  याप्रकरणी पेट्रोलपंप मॅनेजर निलेश रतन पवार यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन जामनेर पो. स्टे. ला जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरची जबरीचोरी ही कुसुंबा येथील मुलानी केली असल्याबाबतची माहीती पोलीस निरीक्षक श्री बबन अव्हाड यांना मिळाली होती. अनुषंगाने कुसुंबा येथुन ऋषिकेश रमेश मावळे रा. साईसिटी यांस पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता ऋषिकेश याने इतर दोन साथीदारासह सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन गुन्हयात वापरलेली मोटारसायकल काढून दिली सदरची कामगिरी मा. पोलिस अधिक्षक श्री माहेश्वरी रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री बबन अव्हाड, पोउपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दिपक जगदाळे, स.फौ अतुल वंजारी, पो.ना सुधिर साळवे, सचिन पाटील, किशोर पाटील, पो.कॉ राहुल रगडे, विशाल कोळी, ललित नारखेडे, म.पो.कॉ राजश्री बाविस्कर यांनी केली असुन आरोपी यांस पुढील कारवाई साठी जामनेर पो.स्टे ताब्यात देण्यात आले आहे.