मौजे महिंदळे येथील गट नं 117/12/2 व 118/1/3/1 ही जागा आदिवासी समाजाच्या मसनवटीकरीता सरकारतफे देण्यात आलेली आहे. त्यास संरक्षण मिळणेकामी व कुंपण बांधणेकामी तसेच या मिळकतीवर एसआरपीएफचे अधिकारी वेळोवेळी शासनाचा धाक दाखवून बेकायदेशीररित्या हस्तक्षेप करण्यापासून मज्जाव करणेबाबत व त्यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांनी केलेले अतिक्रमण हटविणेबाबत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली आहे.
यावेळी महेंद्र मोहन, दाजी तिरसिंग पवार, मुरलीधर शंकर गायकवाड, प्रविण प्रकाश पवार, रविंद्र रमेश मोरे,जितेंद्र छोटू सोनवणे, अक्षय नामदेव मोरे, मीमहेंद्र माळी, देवा सोनवणे,पवन वाघ, शंकर खरात ,बापू बागुल,किरण गायकवाड, राजहंस साळवे, राहुल वाघ यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते निवेदन देतेवेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Social Plugin