घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास जेरबंद करण्यात धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.या कारवाईत चोरट्यांकडून ११ हजार ४०० रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने पथकाने जप्त केले आहेत.
देवपूर पोलिस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात समांतर तपास करीत असताना धुळे एलसीबी पथकाला सदरची घरफोडी ही जयवंत बापू पाटील, (१९) रा. विटाभट्टी , हनुमान मंदिराजवळ देवपूर धुळे याने केल्याची कबुली दिली गुप्त माहिती मिळाली .त्या अनुषंगाने धुळे एलसीबीचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पथकास कारवाईच्या सूचना केल्या . पथकाने जयवंत पाटील यास गाठून त्यांची चौकशी केली असता त्याने वरील गुन्ह्याची कबुली देत ७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे तसेच ४ हजार ४०० रुपये किंमतीचे चांदीचे दागिने असे एकूण ११ हजार ४०० रुपयांचे दागिने काढून दिले. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, यांचे मार्गदर्शनाखाली धुळे एलसीबीचे निरिक्षक दत्तात्रय शिंदे , पोसई बाळासाहेब सूर्यवंशी, पोसई अमरजीत मोरे, पोसई कैलास दामोदर, असई संजय पाटील, शाम निकम ,पोहेकॉ संतोष हिरे,चेतन बोरसे, मुकेश वाघ, पंकज खैरमोडे,प्रकाश सोनार,पोना शशिकांत देवरे,पोकॉ हर्षल चौधरी,जितेंद्र वाघ,महेंद्र सपकाळ,गुणवंत पाटील या पथकाने केली .

Social Plugin