धुळे शहरात सुमारे पंधरा ते वीस हजार पॉवर लुम कामगार असून हे कामगार अत्यंत दयनीय अवस्थेत जगत आहेत.या कामगारांचा समावेश कामगार मंडळात नसल्यामुळे त्यांना इतर कामगारांप्रमाणे त्यांना सुविधा मिळत नाहीत.शहरातील पॉवर लुम कामगारांनी आ.फारुख शाह यांची भेट घेवून इतर कामगारांना ज्या सुविधा शासनाच्या माध्यमातून मिळतात तशा सुविधा पॉवर लुम कामगारांना मिळाव्यात अशी मागणी केली होती.त्यानुसार आ.फारुख शाह यांनी अधिवेशन काळात कामगार कल्याण मंत्री ना.सुरेश खाडे याची प्रत्यक्ष भेट घेवून पॉवर लुम कामगारांचा समावेश कामगार कल्याण मंडळात करण्यात यावा अशी पत्राद्वारे मागणी केली.ना.सुरेश खाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना उचित कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत. पॉवर लुम कामगारांचा कामगार कल्याण मंडळात समावेशाचा मार्ग मोकळा झाल्यामुळे शहरातील पॉवर लुम कामगारांनी आ.फारुख शाह यांना धन्यवाद देत समाधान व्यक्त केले आहे.

Social Plugin