विज मंडळ कंत्राटी कामगार संघटनतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन...

 



धुळे - महाराष्ट्र राज्य विज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी शहरातील जेल रोडवरील क्यूमेन क्लब समोर आंदोलन करण्यात आले. निवेदनात म्हटले की, तिन्ही कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांना आज रोजी मिळत असलेल्या एकुण पगारात बेसिक पुरक भत्ता दि.1 एप्रिल 2023 पासून मागील सर्व फरकासह 30% वेतनात वाढ करून देण्यात यावी, मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफरशींची तातडीने अंमलबजावणी करून सर्व कामगारांना वयाच्या 60 वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार एन.एम.आर.च्या माध्यमातून देऊन त्यांना रोजगारात सुरक्षा द्यावी. याबाबत उर्जामंत्री व प्रशासनाने तातडीने निर्णय घेवून या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेवून तसे परिपत्रक म.रा.वि.वि मंडळ सुत्रधारी कंपनीने त्वरीत निर्गमित करावे, तिन्ही वीज कंपनीतील मंजूर नियमित रिक्त पदांवर व गरजे गुसार काम करत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्यावे. त्यांना नोकरीत सामावून घेई पर्यंत तिन्ही कंपनीमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येऊ नये. या भरतीला उर्जामंत्री यांनी सातमीने स्थगिती देवून खाजगीकरणाच्या संपाच्या वेळी ऊजमिंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी दि.4 जानेवारी 2023 रोजी सह्याद्री शासकीय निवासस्थानी सर्व कायम व कंत्राटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीत जाहीर केलेल्या निर्णया नुसार तिन्ही कंपन्यात भरती प्रक्रिया राबवताना सर्व अनुभवी व कुशल कंत्राटी कामगारांना वयोमयदित सूट द्यावी, रानडे समितीच्या शिफारसी नुसार यांना विशेष आरक्षण द्यावे. तसेच तिन्ही बीज कंपनीमध्ये भरतीसाठीची वयोमर्यादा ही समान असावी. व कंत्राटी कामगारांना या भरती मध्ये प्राधान्य द्यावी. यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी दिपक ओतारी, रोहित महानज,प्रशांत माळी, सचिन जाधव, मोहन कानडे, स्वप्नील पवार, महेंद्र सोनवणे, योगेश साळवे,दिलदार माळी, राजेंद्र वानखेडे, सुनिल गिते,

योगेश गिरासे,हितेश गिरासे,पांडुरंग पाटील,कैलास चित्ते,सुनिल जगदाळे,कल्याण रामोळे,दिपक बडगुजर,मयुर माळी, प्रविण पाटील,जयेश बडगुजर,कमलेश पाटील,

राकेश बडगुजर,चंद्रकांत जाधव आदीसह उपस्थित होते.