रिपाई महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केले 2 लाख रुपयांचे धम्म दान.
समाज बांधवानी ज्यांना कुणाला श्यक्य होईल त्यांनी स्वइच्छेने धम्म दान करावे उत्सव समितचे आव्हाहन.
विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या येणाऱ्या 133 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती जळगाव शहर यांच्या तर्फे काल 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता शहरातील पद्मालाय शासकीय विश्राम गृह येथे महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत जळगाव रेल्वे स्थानकवर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरण करण्याचा महत्वाचा निर्णय समितीतर्फे घेण्यात आला. यासाठी लागणारा खर्च समाज बांधव करणार असून, सुशोभीकरण करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकत रिपाई आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी 2 लाख रुपयांचे धम्मदान केले सौं. भारती म्हस्के यांनी 11 हजार, चंद्रकीरण बिऱ्हाडे यांनी 5000 हजार तर दिलीप अहिरे यांनी देखील 1 हजार रुपयांच धम्म दान केले आहे. समाजातील प्रतिष्टीत लोकांनी व ज्यांना कुणाला श्यक्य होईल त्यांनी देखील धम्म दान करावे अशे आव्हाहन उत्सव समितीच्या वतीने समाज बांधवाना करण्यात आले आहे.
येणाऱ्या 3 तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती 2024 ची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा आखली जाणार असल्याची माहिती उत्सव समिती अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी दिली.
यावेळी उत्सव समिती मार्गदर्शक मुकुंद सपकाळे, अनिल अडकमोल.उत्सव समिती अध्यक्ष सतीश गायकवाड, दिलीप सपकाळे, नितीन मोरे, राधेभाऊ शिरसाठ, सचिन अडकमोल, गणेश पगारे, विशाल अहिरे, राहुल भालेराव,भरत सोनवणे, आबा मोरे, प्रताप बनसोडे, किरण अडकमोल सौ. भारती म्हस्के , सौ. सुजाता ठाकूर पंकज सोनवणे अनिल लोंढे, डिगंबर सोनवणे अशोक सोनवणे, खुशाल सोनवणे, गौतम सरदार, जे.डी भालेराव यांचेसह शहरातील विविध भागातील समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Social Plugin