ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करण्यात आले व त्यांच्या विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कर्मचारी व महापालिका कर्मचारी प्रमाणे वेतन देण्यात यावे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानासाठी लादलेली वसुली रद्द करा तसेच वसुलीची आट रद्द करा ऑगस्ट 2020 चे मार्च 2021 चे थकीत वेतन त्वरित मंजूर करा अशा विविध मागण्या संदर्भात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष जयप्रकाश पाटील, जिल्हा संघटक हर्षवर्धन पाटील, जिल्हा सचिव उदेसिंग ठाकरे, जबरसिंग गिरासे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते..

Social Plugin