भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने नमो चषक कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खा.सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपुरातील जवाहर स्टेडियम येथे कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. या कुस्त्या स्पर्धाचे उद्घाटन माजी आ. राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, जयश्री अहिरराव,प्रतिभा चौधरी, हिरामण गवळी,प्रदीप कर्फे,ओम खंडेलवाल, यशवंत येवलेकर ,संदीप बैसाणे,जिल्हा प्रवक्ते शाम पाटील,भा. ज. यु.मो अध्यक्ष आकाश परदेशी , उपाध्यक्ष राजेंद्र खंडेलवाल, संजय बोरसे,अजय अडवाल, समिल कपिल,प्रकाश पोळ,अँड.किशोर जाधव, प्रथमेश गांधी, मंडल अध्यक्ष ईश्वर पाटील,बंटी धात्रक, पंकज धात्रक,वैशाली शिरसाठ,सुनिल बैसाणे,शाम पाटील, सुहास अंपळकर, रंगनाथ ठाकरे,प्रदीप पानपाटील, विजय बडगुजर,जयवंत वानखेडकर, योगेश मुकंदे, अमोल मासुळे, शांताराम पाटील, देवपूर पोलिस ठाण्याचे पीआय धनंजय पाटील,चेतन गवळी , सचिन पाटील, आदी सह मान्यवरांच्या उपस्थित होते . तसेच तालीम संघाचे तालुका अध्यक्ष रवींद्र आघाव, पंच म्हणून राम कानडे,शाम कानडे,गोरख पाटील,प्रवीण जाधव, कृष्णा शिंदे, छोटू पाटील , लाला चौधरी, सुनिल चौधरी, दत्तात्रय कल्याणकर ,यांच्यासह सहकार्यानी कामकाज पाहिले यावेळी कुस्ती देखण्यासाठी शहरातील मल्ल व कुस्ती प्रेमींनी गर्दी केली होती. सदर कुस्ती ही चार दिवस सुरू असणार आहे.


Social Plugin