धुळे शहराचे आ.फारूख शाह साहेब यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. धुळे शहराच्या विविध भागात असलेली सर्व शासकीय नीमशासकीय कार्यालये एकाच छताखाली येण्याच्यादृष्टीने तसेच शहरातील भाडे तत्वावर असलेले सर्व शासकीय निम शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न यशस्वी करण्याचे महत्त्वपूर्ण काम आ.फारुख शाह यांनी यानिमित्ताने केलेले आहे. आ.फारुख शाह यांच्या प्रयत्नाने आतापर्यंत धुळेकर नागरिकांना प्रशासकीय सुविधा सक्षमपणे उपलब्ध व्हावी म्हणून विविध कार्यालये उभारण्यात आली आहेत.त्यात प्रामुख्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाची इमारत,एम.आय. डी.सी.प्रादेशिक कार्यालय इमारत व सुसज्ज अग्निशमन केंद्र,शासकीय तंत्रनिकेतन ग्रंथालय इमारत,आदिवासी प्रकल्प कार्यालय इमारत, आय.टी.आय. इमारत,आर. टी.ओ.कार्यालय इमारत,न्यायाधीश निवासस्थान, तसेच आदिवासी मुलींचे व मुलांचे वसतिगृह,भा. हि. वै.महाविद्यालयात क्लास रूम,ग्रंथालय,व निवासी अधिकारी निवासस्थान ,कारागृह इमारत,शहरातील ४ ठिकाणी अभ्यासिका याचा समावेश आहे.गेल्या चार वर्षात सर्वात जास्त प्रशासकीय इमारती बांधण्याचा विक्रम आ.फारुख शाह यांनी केलेला आहे.
साधारणतः शहरातील ३८ ठिकाणी शासनाचे भाडेतत्वावर वेगवेगळे कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या भाड्या पोटी शासनाला दर माह ४० ते ५० लाख रुपये द्यावे लागतात. तसेच ही कार्यालये शहरात दूर दूर पर्यंत विखुरलेली असल्याने जनतेला दैनंदिन कामे करण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात त्यामुळे जनतेच्या पदरी मनस्तापच येतो तसेच जनतेचा पैसा आणि वेळ वाया जातो हि समस्या पाहता आ.फारूख शाह यांनी या साठी पाठपुरावा करत या प्रशासकीय इमारतीच्या कामा साठी सुमारे ४० कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला असून या कामाचा शुभारंभ आज आ.फारूख शाह यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ.फारुख शाह यांचेसोबत सार्व.बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील,उपअभियंता धर्मेंद्र झाल्टे, कनिष्ठ अभियंता लोकरे ,नासिर पठाण, सईद बेग,डॉ.दीपश्री नाईक,युसुफ पापा सर,आसिफ शाह,इकबाल शाह,निजाम सैय्यद,प्यारेलाल पिंजारी,डॉ.बापुराव पवार,हारुण खाटीक,इब्राहीम पठाण,छोटू मच्छीवाले, निसार शाह, जाहीद अन्सारी, ईलियास अन्सारी,सऊद आलम,सलमान खान,फैजल अन्सारी,गोलू शाह,समीर शाह,आदी उपस्थित होते

Social Plugin