धुळे - मुळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आपला महाराष्ट्र येथील पत्रकार संघाच्या झालेल्या निवडणूकीत पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मदाने यांच्या अध्यक्षतेखाली सर्वांनुमते धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यात अध्यक्ष पदी यशवंत हर्णे, उपाध्यक्ष पदी रवि शिंदे, सरचिटणीस पदी डी. बी. पाटील, खजिनदारपदी सुवर्णा टेंबेकर, प्रांतिक सदस्य पदी प्रा. जसपाल सिंह सिसोदिया यांच्या सह कार्यकारीणी सदस्य पदी सुनील सिंह परदेशी, कैलास गर्दे, जितेंद्र राजपूत, प्रदीप जाधव, शोभा आखाडे, पवन मराठे, मनोज बैसाने, बापू अहिरे, सोपान देसले, तवाब अन्सारी, विलास देसले, अजिम शेख, गोकुळ देवरे, जॉनी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रमेश दाने, ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे, महेश घुगे, आशुतोष जोशी, नरेंद्र जमादार, दिनेश रावल, विशाल ठाकूर, विजय चौधरी, राजेंद्र गर्दे, प्रकाश चव्हाण, पंकज पाटील, सुनील निकम, गणेश पवार, देविदास पवार, महेंद्र राजपूत, भूषण बागुल, मनोज चौधरी, सिद्धार्थ मोरे, युवराज मोहिते, मोनिका शिंपी, सुनील अमृतकर, रोशन खैरनार, संदीप त्रिभुवन, राजेंद्र गुजराती, राजू कापडणीस, गोपाल कापडणीस, दिलीप वाघ, सुनील गवळी, अजय गर्दे, तुषार परदेशी, प्रदीप राजपूत, भरत काळे, यांच्यासह शेकडो पत्रकार उपस्थित होते.

Social Plugin