सरकारने ईपीएस पेन्शनसेचा प्रश्न लोकसभा निवडणूक आचार संहिता लागण्यापूर्वी सोडवण्याकरिता शहरातील जेल रोडवरील क्यूमाईन क्लब समोर आंदोलन करण्यात आले. निवेदनात म्हटले की , ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती ही गेल्या ७ वर्षापासून पेन्शनसच्या न्याय मागण्या व हक्कासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली भारत सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या श्रम मंत्रालय व केंद्रीय भविष्य निधी संघटन, नवी दिल्ली तसेच वित्त मंत्रालय व पंतप्रधान कार्यालय यांच्याशी सुरू आहे. आज मिळणारे पेन्शन रू. ७५० रू ते ३५०० रुपये रकमे इतके तुटपुंजे मिळत आहे. तर सरासरी पेन्शन रक्कम १९७१ रू. इतकी येते. पेन्शनर कर्मचाऱ्यांने सेवेत असताना आपल्या कष्टाच्या कमाईतून सेवानिवृत्तीनंतर स्वाभिमानाने जगता यावे, म्हणून सन १९९५ पासून पेन्शन फंडात ४१७ रू ते ५४१ रू. व १२५० रुपयांची इतकी रक्कम दरमहा गुंतवणूक केली आहे. त्या रकमेची व्याजासह आजची गोळा बेरीज केली तर २०.०० लाख होते, त्यानुसार त्यावरील दरमहा मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून ७५०० हजार व महागाई भत्त्याची मागणी पूर्ण होवू शकते , याबाबत सरकारच्या पार्लमेंटरी कमिटीचा अहवाल देखील लोकसभेत सादर झाला. परंतु किमान पेन्शन ७५०० रुपयात महागाई भत्ता देण्याबाबत सरकारने सदर बाब स्पष्ट केलेली नाही. माहे . नोव्हेंबर २०२३ ते आज पर्यंत असंख्य बैठका संबंधित मंत्रालय व ईपीएफओ अधिकाऱ्यांसोबत झाल्या असून, त्यामुळे किमान पेन्शनात ७५०० रुपये व महागाई भत्ता व अन्य ३ मागण्यांचा प्रश्न असुनी सुटलेला नाही. किमान पेन्शनसंदर्भात सरकारतर्फे सुचविण्यात आल्यानुसार नुकतेच ४ प्रकारचे प्रस्ताव व तसंसंबंधी आर्थिक आकडेवारी देखील सादर केली . देशभरातील खासदार व विविध मंत्रालयांचे मंत्री महोदय हे सर्वच मान्यवर या प्रश्नांवर सहानुभूती व आपुलकी दाखवितात तर सदर प्रश्न सोडवण्यासाठी दाद कुणाकडे मागावी ? व आम्हाला मिळणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये कसे जगावे याचा सरकारला जाब विचारण्यासाठी लोकसभेची निवडणूक आचारसंहिता लागू होण्यासाठी आज आंदोलनासाठी रस्त्यावर उतरत असून देशभरात ईपीएफओ कार्यालयासमोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह, धरणे निदर्शने, बैठक सत्याग्रह आयोजित केलेले आहे . यावेळी आंदोलनात ए. वाय सोनवणे, भोजूसिंग अण्णा गिरासे,जे.आर. सूर्यवंशी, संजय पाटील, गोरख माळी, एन.जी.राजपूत, अनिल भामरे, नथू मराठे, ए. डी पाटील, कॉ. एल.आर.राव आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

Social Plugin