धुळ्यातून पुन्हा खासदार डॉ.सुभाष भामरेंना लोकसभेची उमेदवारी ; कार्यकर्त्यांचा जल्लोष.




खा.डॉ.सुभाष भामरे यांना भाजपाच्या वतीने लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याने धुळ्यात भाजपा तर्फे झाशी राणी चौकात फटाक्याची आतिषबाजी करत , पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला आहे .यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी डी जे च्या तालावर ठेका धरल्याचे दिसून आले.

गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारी कोणाला मिळणार ? याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते.

अनेक दिग्गज या उमेदवारीच्या रेसमध्ये देखील होते.मात्र पक्षाने पुन्हा एकदा डॉ.भामरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.त्यामुळे धुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे. या प्रसंगी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ माजी नगरसेवक हिरामण गवळी, यशवंत येवलेकर, शांताराम पाटील ,चेतन मंडोरे, सतिष अंपळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, उपजिल्हाध्यक्ष पंकज धात्रक, सुहास अंपळकर, सागर चौधरी, अनिल सोनार , पंकज अग्रवाल यांच्यासह  भाजपा महिला उपप्रदेशाध्यक्षा जयश्री  अहिरराव, माजी महापौर प्रतिभा  चौधरी,माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर,भाजपा महिला शहराध्यक्षा वैशाली शिरसाठ, माजी नगरसेविका आरती पवार, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.