मेहरूण वि.का. सोसायटीच्या चेअरमन पदी सुनील वंजारी तर व्हॉइस चेअरमन पदी जयंत सोनवणे यांची बिनविरोध निवड.

 



मेहरूण येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची  2024 ते 2029 पर्यंतची नवीन संचालक  मंडळाची विशेष सभा आज आयोजित करण्यात आली होती. यात चेअरमन पदी श्री सुनील वसंत वंजारी यांची व  व्हाईस चेअरमन पदी श्री जयंत किसन सोनवणे यांची  बिनविरोध निवड करण्यात आली. यांचबरोबर संचालक मंडळात श्री सुनील भाऊ सुपडू महाजन, श्री भागवत बुधो धांडे , श्री ज्ञानेश्वर वामन नाईक, श्री प्रमोद यशवंत नाईक,श्री सुखदेव परशुराम सोनवणे , श्री सुदाम दोधु पाटील ,श्री  गणेश विठ्ठल सोनवणे ,श्री निरंजन जगन्नाथ पाटील श्री भूषण राजेंद्र सोनवणे ,श्रीमती मंदाकिनी लक्ष्मण महाजन  ,श्रीमती सुनंदाबाई भास्कर नाईक, श्री भागवत चावदस सानप तसेच तज्ञ्ज्ञ संचालक पदी श्री योगेश पुंडलिक सांगळे ,जयराम नामदेव पाटील , अँड. बुरानुद्दिन सदृद्दीन पिरजादे यांची निवड करण्यात आली. मेहरुण गावाची ही परंपरा कायम राखण्यात आली आहे . यामुळे गावातील सर्व समाज बांधव यांनी सहकार्याची भूमिका घेतली असून निवडीसाठी गावातील लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले.  यात श्री सुनील भाऊ महाजन, श्री प्रशांतभाऊ सुरेश नाईक, श्री गणेशभाऊ किसन सोनवणे ,श्री अशोकभाऊ सिताराम लाडवंजारी यांनी बिनविरोध प्रक्रियेसाठी  सहकार्य केले.  यावेळी श्री एस.एस शिंदे सहकार अधिकारी व सचिव गोकुळ पाटील ज्ञानेश्वर घुगे यांचे देखील सहकार्य लाभले.