ॲड.पियुष नरेंद्र पाटील यांचे आई-वडील यांच्या लग्नाच्या सोन्यावर विजय पाटील व त्यांचे साथीदार यांनी काही दिवसांपूर्वी दरोडा टाकत, चोरी केल्याप्रकरणी व फिर्यादी पियुष पाटील यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बंदुकीचा धाक दाखवीत, अंगावरील कपडे काढून, रुमालाने तोंड दाबत, दोरीने हात पाय बांधून, दांडका, लाथा, बुक्के व पट्ट्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात दाखल गुन्ह्यातील आरोपीचा जामीन रद्द करण्यासाठी फिर्यादी पियुष पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली असून पियुष पाटील यांनी याप्रकरणी तपास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, ११-१०-२२ रोजी विजय पाटील, संजय पाटील, मनोज पाटील, शैलजा नरेंद्र गांगुर्डे, नरेंद्र गुलाबराव गांगुर्डे, रागिनी सुहास चौधरी, सुहास वसंत चौधरी यांनी पियुष पाटील यांच्या आई - वडिलांचे लग्नाचे सोने, दागिने ताब्यात घेण्यासाठी पियुष व त्यांच्या आईला जबर मारहाण करीत सोने, दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले होते. याबाबत 26 एप्रिल 2023 रोजी या सर्वांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयातील मुख्य आरोपी विजय पाटील,संजय पाटील,मनोज पाटील यांना अटक देखील झाली होती. चोरलेला मुद्देमाल हा आरोपी संजय पाटील व मनोज पाटील यांच्या खाजगी बँकेतील लॉकरमध्ये लपवून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंत्तर हा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत देखील करण्यात आला होता. सदर प्रकरणाचे तपास काम अद्याप सुरू असून, कोर्टात दोषारोपपत्र देखील पाठवणे बाकी आहे. या प्रकरणात फिर्यादी पियुष पाटील यांनी व त्यांची आई यांनी कोर्टासमोर इन कॅमेरा 164 चा जबाब देखील नोंदविला होता. यामुळे आरोपी यांची समाजात मोठ्या प्रमाणावर बदनामी झाल्याने आरोपीचा फिर्यादी पियुष पाटील व त्यांचे आईवर प्रचंड राग होता. त्यामुळे सदरचा गुन्हा फिर्यादी याने मागे घ्यावा असा मॅसेज आरोपी सुहास चौधरी मार्फत पियुष पाटील यांस देण्यात आला होता. परंतु पियुष यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. यांनतर 28 - 12- 2023 रोजी पियुष पाटील हे नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाज आटपून रात्री ११:०० ते ११:३० च्या सुमारास त्यांचे राहते घरा खाली दिक्षित वाडी येथील नेहमीच्या नियोजित जागी अपार्टमेंट खाली दुचाकी लावून मोबाईल बघत गाडीवरच बसले होते. यावेळी समोरील बोळीतून विजय पाटील हा आला व त्याने पियुष पाटील यांना लाथ मारून खाली पाडले. विजय पाठोपाठ संजय पाटील, नरेंद्र गांगुर्डे, सुहास चौधरी हे देखील त्याठिकाणी आले. पियुष याच्या सोबतीला कोणी नसल्याचा फायदा घेत विजय पाटील याने पियुष पाटील यांना शिव्या देत, जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बंदूक काढून पियुष याच्या कमरेला बंदूक लावली. याचा फायदा घेत संजयने खिशातील रुमाल काढून पियुष यांचे तोंड दाबले. व नरेंद्र गांगुर्डे,सुहास चौधरी यांनी पियुष यांचे दोन्ही हात घट्ट पकडून बंदुकीचा धाक दाखवत, विजय पाटील राहत असलेल्या घराच्या तळघरात पियुष यांना घेऊन गेले. त्यानंतर पियुष पाटील यांच्या अंगावरील कपडे काढून, रुमालाने तोंड दाबत, दोरीने हात पाय बांधून दांडका, लाथा, बुक्के व पट्ट्याने बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी पियुष पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी विजय पाटील, संजय पाटील, सुहास चौधरी, शैलेजा गांगुर्डे, नरेंद्र गांगुर्डे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
आरोपीचा जामीन रद्द करण्यासाठी पियुष पाटील यांची न्यायालयात धाव.
सदर गुन्ह्यातील आरोपीना पहिल्या गुन्ह्यात न्यायालयाने जामीन मंजूर करताना, अटी शर्थीवर जामीन मंजूर केला होता. यात आरोपी यांनी पियुष पाटील व त्यांच्या आई यांना कुठलाच दबाव टाकून,पुराव्यांसोबत छेडछाड करणार नाही, व जामीन झाल्यापासून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत आरोपी हे दीक्षित वाडी भागात प्रवेश करणार नाही अश्या प्रकरच्या अटी व शर्थीवर जामीन मंजूर केला होता. परंतु पूर्ववैमनस्त्यातून आरोपीनी न्यायलयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत पियुष पाटील यांचे अपहरण करून, बंदुकीचा दाख दाखवत, रात्रभर डांबून ठेवून, जबर मारहाण करीत, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. असे असताना आरोपीनी जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला असून, फिर्यादी पियुष पाटील यांनी आरोपीचा जामीन रद्द करण्यासाठी जळगाव न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान आरोपी यांचा जामीन रद्द केल्यानंतर आरोपी विजय पाटील यांच्यासह साथीदारांना छ. संभाजीनगर हायकोर्टात जामीनासाठी धाव घ्यावी लागणार असून त्यामुळे आरोपी यांच्या अडचणीत मात्र चांगलीच वाढ होणार आहे.

Social Plugin