यावल फैजपुर रोडवर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा अपघात डंपरचे झाले दोन तुकडे पहाटेची घटना सुदैवाने जीवित हानी टळली.

 



आज सकाळी अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरचा अपघात झाला असून, यात डंपरचे दोन तुकडे झाल्याची घटना यावल फैजपुर रोडवर घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी कि, 

आज 31 मार्च रोजी सकाळच्या दरम्यान यावल-फैजपुर रोडवर अवैद्य गौण खनिजाची अवैध वाहतुक करणार्‍या डंपरचा भिषण अपघात झाल्याची माहीती प्राप्त झाली असुन,  हा अपघात ईतका भिषण आहे की यात डंपरची दोन तुकडे झाले आहेत., मात्र या अपघातात जिवीतहानी झाली नसल्याचे समजते.  यावल तालुक्यात मोठया प्रमाणावर रात्रीच्या वेळीस भरधाव वेगाने धावणार्‍या डंपराव्दारे किंवा ट्रॅक्टर व्दारे अवैद्य वाळुची वाहतुक करण्यात येत असुन, आज 31 मार्च रोजी पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान यावल फैजपुर मार्गावरील ढाके वकील यांच्या शेताजवळच्या पुढील वळणावर वाळुची वाहतुक करणार्‍या एका चार चाकी डंपरचा भिषण अपघात झाला आहे ,या अपघातात डंपरचा वेग ईतका होता की यात डंपरचे दोन तुकडे झाले आहे.


या मार्गावर सकाळच्या सुमारास मोठया संख्येत अनेक नागरीक महिला पुरुष हे वॉकिंग करण्यासाठी जात असतात.  सुदैवाने अपघात झाला त्यावेळी या ठीकाणी कुणी ही वॉकिंगला जाणारे पादचारी मिळून आले नाही.  अन्यथा या अपघातात मोठी जिवितहानी झाली असती,तरी महसुलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल  घेऊन अवैद्य गौण खनिजाची वाहतुक करणाऱ्यांवर करवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे .