दुचाकी मागितल्याच्या रागातून तरुणांस बेदम मारहाण करून लोखंडी सळई डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना अंमळनेर तालुक्यातील कलाली गावात घडली होती. याप्रकारणी आता मारवड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अंमळनेर तालुक्यातील कलाली गावात मच्छिंद्र आधार कोळी वय-३०, हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान गावातील समाज मंदिर ओट्याजवळ मच्छिंद्र कोळी याने दुचाकी मागितल्याचा राग आल्याने गावात राहणारा विनोद उर्फ पिंग्या भगवान भिल याने मच्छिंद्र कोळी याला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच हातातील लोखंडी सळई घेऊन डोक्याला मारहाण केल्याने गंभीर दुखापत केल्याची घटना गुरुवार २८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता घडली होती . याप्रकरणी मच्छिंद्र कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवार २९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता संशयित आरोपी विनोद उर्फ पिंग्या भगवान भिल याच्या विरोधात मारवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील हे करीत आहे.

Social Plugin