स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायी व स्फूर्तीदायक ठरणार - महामंत्री विजय चौधरी




शहरातील मध्यवर्ती भागात असलेले थोर स्वातंत्र्यवीर वि. दा सावरकर स्मारक जीर्ण झाले होते  .तसेच त्यांची दुराव्यवस्था झाली होती .त्यामुळे स्मारकांचे सुशोभीकरण व नूतनीकरण  करण्याच्या विकास कामाचे भूमिपूजन भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी व माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत दि.२ मार्च रोजी  शनिवार रोजी  सकाळी १० वाजता करण्यात आले.

स्वातंत्र्यवीर वि. दा सावरकर यांच्या स्मारक नूतनीकरण कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीष महाजन,आ. अमरीशभाई पटेल,आ. जयकुमार रावल यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या  माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या संकल्पनेतून व सततच्या पाठपुराव्यामुळे धुळे महापालिका विकास शुल्क निधी अंतर्गत सदर पुतळ्याच्या सुशोभीकरण व नूतनीकरण करण्यासाठी सुमारे रू. एक कोटी खर्चाचे काम मंजूर करण्यात आले होते. धुळे मनपा विकास शुल्क निधीतून फक्त रस्ते, गटारीचे काम न घेता शहराच्या सौंदर्यात भर पडणारे वीर सावरकर स्मारकला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मारक, झाशी राणी लक्ष्मीबाई स्मारक धुळे शहरातील देवपूरातील गवळी समाज स्मशानभूमी विकसित करणे अशी कामे घेतली आहेत.भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले की, एक कोटी रुपयात स्मारकाचे नूतनीकरण होऊन कायापालट केला जाणार आहे. याकरिता सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो व धन्यवाद देतो. त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता केलेले काम अतुलनीय आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मदनलाल मिश्रा, माजी आ. राजवर्धन कदम बांडे, विभाग संघचालक प्रशांत मोराणकर, विभाग कार्यवाह राजेश पाटील, शहर संघचालक संजय देसले, माजी शहर संघ चालक साहेब चंद जैन , विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी महापौर चंद्रकांत सोनार ,मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती अमिता दगडे पाटील मॅडम, मनपा शहर अभियंता कैलास शिंदे, नाशिक विभागीय अध्यक्ष महेश मुळे सर, प्रदेश उपाध्यक्ष सौ. जयश्रीताई अहिरराव, माजी सभापती सुनील बैसाणे,माजी नगरसेवक श्री नरेश आप्पा चौधरी, प्रदेश ओबीसी उपाध्यक्षा  सौ. मायादेवी परदेशी, मा. सभागृह नेत्या सौ. भारतीताई माळी, प्रदेश सदस्या डॉ माधुरी बाफना ,महिला भाजपा अध्यक्षा सौ. वैशालीताई शिरसाठ , सरचिटणीस ओम खंडेलवाल, सरचिटणीस यशवंत येवलेकर, भाजपा प्रवक्ता श्री पृथ्वीराज पाटील, सरचिटणीस श्री. चेतन मंडोरे, आर्किटेक्ट योगेश ठाकरे रावसाहेब, माजी जिल्हा उपाध्यक्ष भाजपा प्रा सागर चौधरी, मंडळ अध्यक्ष अरुण पवार, जिल्हा उपाध्यक्ष अमोल दाऊ शेठ चौधरी, हेमंत मराठे, संजय बोरसे,डॉ.महेश घुगरी, शेखर कुलकर्णी,नंदू कुलकर्णी,सौ निशाताई चौबे,सौ. गिताताई कटारिया,सौ. आरतीताई महाले,माजी नगरसेविका सौ  आरतीताई पवार,माजी नगरसेविका सौ. मंगलाताई पाटील, सुरज चौधरी, अजय कासोदेकर,प्रा अतुल पाटील, प्रा संजय देवरे, प्रा जयेश कोरसर, प्रा चेतन देवरे, बिपिन रोकडे, कमलाकर पाटील, जयंत वानखेडकर, राजेंद्र मोरे, अण्णासाहेब खेमनार, डॉ.चेतन पाटील सर, मुन्ना शितोळे, चंद्रकांत महाजन, वैभव सयाजी, आदित्य शाह, योगेश चौधरी, विकास चौधरी, दिनेश चौधरी, सचिन आखाडे, जिग्नेश खैरनार, आदी उपस्थित होते.