आ.फारुख शाह यांचेहस्ते दिशा दर्शक फलकाचे लोकार्पण संपन्न

 


धुळे - महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास योजना अंतर्गत धुळे मनपा क्षेत्रात स्थळ दर्शक व दिशा दर्शक फलक बसविणे या  कामाचे  लोकार्पण  आ.फारुख शाह  यांचे शुभहस्ते चाळीसगावरोड  चौफुली येथे  संपन्न झाला.

        महाराष्ट्रातील प्रत्येक लहान मोठ्या शहरात बाहेरून येणाऱ्या अभ्यागतांसाठी शहरातील महत्वाच्या ठिकाणांची,रस्त्यांची शासकीय कार्यालयांची माहिती व्हावी आणि गैरसोय टळावी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्यावतीने स्थळदर्शक - दिशादर्शक फलक लावले आहेत.मात्र महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या करंटेपणामुळे धुळे शहरात स्थळदर्शक - दिशादर्शक फलक लावण्यात आले नाही.ही उणीव दूर व्हावी आणि धुळे शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून मला हा प्रपंच करावा लागत असल्याचे प्रतिपादन आ.फारुख शाह यांनी लोकार्पणप्रसंगी केले.महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास योजना अंतर्गत धुळे मनपा क्षेत्रात स्थळ दर्शक व दिशा दर्शक फलक बसविणे या  कामाचे  लोकार्पण चाळीसगाव चौफुली येथे आ.फारुख शाह यांचे हस्ते संपन्न झाले यावेळी नगरसेवक नासिर पठाण,नगरसेवक सईद बेग,नगरसेवक गणी डॉलर,नगरसेवक आमिर पठाण,डॉ.दीपश्री नाईक,मौलवी शकील,छोटू मच्छीवाले,प्यारेलाल पिंजारी,निजाम सैय्यद,इकबाल शाह,साजिद साई,डॉ.बापुराव पवार,परवेज शाह,कैसर अहमद,अझर सैयद,राजु लीडर,मलेका खाटीक,सायरा अन्सारी, हारुण खाटीक, गफ्फार शाह,माजीद पठाण,आसिफ शाह मुल्ला,आसिफ पोपट,रफिक शाह,शहजाद मंसूरी, खालिद अन्सारी, सऊद आलम,सलमान खान,फैजल अन्सारी,हाशिम अन्सारी,गोलू शाह,समीर शाह आदी उपस्थित होते.