हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कार्यालयाचे उद्घाटन.

 


गुढी पाडव्यानिमित्त हिंदु नववर्ष स्वागत प्रित्यर्थ धुळे शहर हिंदु  नववर्ष स्वागत यात्रा समिती च्या वतीने भव्य स्वरूपात शोभायात्रा  काढण्यात येणार असून यात्रा समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन आज सकाळी खासदार डॉ.सुभाष भामरे ,माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. दि.९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आई एकविरा मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात होईल. या यात्रेत हजारो धुळेकर नागरिक सहभागी होतील.यंदा लोकसभा निवडणूक पाडव्याच्या कालावधीतच येत असल्याने शोभायात्रेच्या माध्यमातून मतदार जनजागृती देखील करण्यात येणार आहे. शोभायात्रेसह आठवडाभर विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे . यात्रा समितीच्या संपर्क  कार्यालयाचे आज उद्घाटन झाले त्या प्रसंगी आयोजकांनी ही माहिती दिली. यावेळी खा. भामरे  यांच्यासह राजवर्धन कदमबांडे,माजी महापौर प्रतिभाताई चौधरी ,विजय पाच्छापुरकर ,मनोज मोरे,डॉ.माधुरी बाफना,हिरामण गवळी,बंटी मासुळे, आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.