आंबेडकरी व कामगार चळवळीचे ज्येष्ठ नेते एम.जी.धिवरे यांचे वृद्धापकाळाने निधन.



गेल्या ५५ वर्षापासून सतत कष्टकरी, कामगार, शोषित पिढीत, दलित, बहुजन आंबेडकरी, समाजासाठी काम करणारे सच्चे आंबेडकरी योद्धे  कालकथित एम.जी धिवरे जिभाऊ यांचे आज दि (६) सकाळी ७ वाजता वयाच्या ८२ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ५ वाजता सिद्धार्थ नगर, चितोड रोड येथील राहत्या घरापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जेल रोड,एक संघ चौक,जुनी मनपा कार्यालय, महात्मा गांधी पुतळा ते आग्रा रोड ने  देवपूर अमरधाम येथे समाप्त होईल.