आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात महायुतीने आरपीआय आठवले गटाला राज्यात दोन जागा द्याव्यात अशी मांगणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. गेल्या 10 वर्षांपासून आरपीआय आठवले गट भाजपासॊबत आहे शिर्डी मधून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच सोलापूरमधून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत त्यात दोन्ही जागा एससी राखीव मतदार संघ आहेत त्यामुळे महायुतीने दोन्ही जागा द्याव्यात अशी मांगणी अनिल अडकमोल यांनी केली आहे.

Social Plugin