रावेर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्या नंतर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरींचे भावनिक पत्र सर्वत्र व्हायरल झाले आहे. यात राजेंद्र चौधरी यांनी थेट शरद पवारांना "साहेब आपल्या पक्षात निष्ठेला किंमत आहे का ?" असा उद्बोधक प्रश्न विचारून त्यांनी पक्ष नेतृत्वा समोर मार्मिक शब्दात आपली बाजु मांडल्या नंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहेत. मा.आमदार संतोष चौधरी, जिल्हा अध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, अथवा रमेश पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी संबंधित पत्रात त्यांनी केली असुन, रावेर लोकसभा मतदार संघात उमेदवार बदलावा अन्यथा सदरचा राजीनामा मंजुर करावा अशी भुमिका त्यांनी घेतल्या नंतर त्यांना थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोठ्या नेत्याचा फोन आल्याची सूत्रांची माहिती आहे.
"राजीनामा देऊ नका हक्काने सांगतो" असे म्हणत त्यांनी चौधरींचा राजीनामा नामंजूर करण्याचे सांगितल्या नंतर देखिल चौधरी राजीनामा देण्यावर ठाम आहे.
दरम्यान पक्ष न सोडता प्राथमिक सदस्य म्हणुन पक्षातच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा उपाध्यक्ष पद जवळ ठेऊन पक्षाच्या आदेशाचा अवमान करणे हे तत्वात बसत नसल्याने साधारण कार्यकर्ता म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याच पक्षात सध्यातरी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपली नाराजी ही फक्त रावेर लोकसभा उमेदवार निवडीवर असुन निवडणूक होईपर्यंत पक्षाचं चिन्ह लाऊन पक्षाचा प्रचार करणार नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितल्याचे बोलले जात आहे. दरम्यान भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या १५ तारखेच्या बैठकी कडे सर्वांचं लक्ष लागुन आहे


Social Plugin