जळगाव लोकसभेत प्रफुल्ल लोढा हेच विजयी उमेदवार असतील- वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांची प्रतिक्रिया.

 




जळगांव लोकसभेसाठी वंचीतकडून प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी जाहीर झाली असून आतां जळगाव लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जळगाव लोकसभेत प्रफुल्ल लोढा हेच विजयी उमेदवार असतील अशी प्रतिक्रिया वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी दिली आहे.  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष  बाळासाहेब तथा अँड प्रकाशजी आंबेडकर यांनी जळगांव लोकसभेसाठी आरोग्य‌दुत  प्रफुल्ल लोढा यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. जळगांव लोकसभा मतदारसंघात भाजप कडून स्मिता वाघ व उबाटा कडून करण पवार लढत असताना प्रफुल्ल लोढा यांना वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी जाहीर झाल्याने आता जळगांव लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान जळगाव लोकसभेत वंचितचे प्रभावी संघटन असुन त्यात प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी मिळाल्याने ही निवडणूक अत्यन्त चुरशीची होणार आहे.


जळगांव जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांचेशी संपर्क साधला असता वंचित बहुजन आघाडी जळगांव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रफुल्ल लोढा हे विजयी उमेदवार असतील असा दावा इंगळे यांनी केला आहे. जळगांव लोकसभा मतदार संघात आमचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे असे देखील यावेळी ते म्हणाले.