धुळे लोकसभा मतदार संघाच्या महायुतीचे उमेदवार प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.

 




धुळे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुभाष भामरे यांचे मध्यवर्ती  प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात आले.श्रीराम नवमीच्या  औचित्य  साधुन प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महायुतीमध्ये सहभागी  झालेले मित्र पक्ष  शिवसेना , आरपीआय, मनसे, राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


धुळे शहरातील गल्ली नंबर पाच मधील  सुवर्णकार भवन या ठिकाणी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.धुळे लोकसभा मतदारसंघातील  महायुतीचे उमेदवार खासदार भामरे यांचे भामरे प्रचाराचे काम या ठिकाणी होणार आहे.



यावेळी अजित पवार गटाचे कैलास चौधरी,किरण पाटील,सुमित पवार,जया साळुंखे, शिंदे गटाचे  सतिष महाले,मनोज मोरे,संजय वाल्हे , मनसेचे संजय सोनवणे,प्रसाद देशमुख , आरपीआय चे शशी वाघ, तसेच भाजपचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे , जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर,अनुप अग्रवाल,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी,रोहित चांदोडे, माजी महापौर प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार,प्रदीप कर्फे, ओम खंडेलवाल,माधुरी बाफना, हिरामण गवळी , प्रथमेश गांधी,पंकज धात्रक ,यशवंत येवलेकर,सचिन शेवतकर ,जीवन शेडगे आदी उपस्थित होते.