धुळे - महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त न्याहळोद येथे 120 महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. सामाजिक कार्य करत असताना समाजाचं देणं लागतो या सामाजिक बांधिलकीतून मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या शोभाताई आखाडे व बापू बाविस्कर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थितांना सखोल असं मार्गदर्शन केले आहे.
महापुरुषांची जयंती सामाजिक बांधिलकीतून साजरी करण्याचा मानस शोभाताई आखाडे यांनी व्यक्त केला होता. त्याच माध्यमातून त्यांनी न्याहळोद येथील 120 महिलांना साड्यांचे वाटप करून जयंती साजरी केली आहे. यावेळी उपस्थित महिलांनी देखील त्यांच्या या उपक्रमाच तोंड भरून कौतुक केल आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी, मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे, माजी अध्यक्ष हेमंत मदाने, विशाल ठाकूर, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी, सामाजिक कार्यकर्ते नाना साळवे, गौतम पगारे, बापू बागुल, एडवोकेट विशाल साळवे, न्याहळोदच्या सरपंच कविता वाघ, कुवर कढरे, संतोष कढरे, बापू कढरे, कविता माळी, जयवंत माळी, ज्ञानेश्वर रोकडे, राम माळी, सुनिल पुराणिक, राकेश पवार, अल्ताफ खाटीक, हनीफ खाटीक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Social Plugin