सुप्रीम कॉलनी - पुष्पा पेट्रोल पंप जवळ झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपीस ३ दिवस पोलीस कोठडी तर अल्पवयीन आरोपीची निरीक्षण गृहात रवानगी


 

दिनांक ११ मे रात्री ९.१५ वाजे च्या दरम्यान सुप्रीम कॉलनी ते पुष्पा पेट्रोल पंप  दरम्यान मोटरसायकल ला कट लागल्याबद्दल ओलो गाडीतील तीन तरुणांना बेदम मारहाण करून त्यातील एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला होता.

त्याच रात्री गंभीर जखमी असलेला जुनेद खान गंभीर खान यास जीएमसी मध्ये ऍडमिट केल्यावर प्रकृती जास्त खालवल्याने ओम क्रिटिकल येथे ऍडमिट करण्यात आलेले आहे. हल्ली जुनेद हा व्हेंटिलेटर वर असून त्याची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर आहे.




 त्याच्या सोबत असलेले  दोन्ही मित्र सलमान गफार  मनियार व  ईक्रामोद्दिन   अमिनोद्दीन शेख यांना किरकोळ दुखापत झाली होती.

३०७ चा गुन्हा दाखल


सलमान मनीयार यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१७/२४ भादवी ३०७,१४३, १४७, १४८, १४९ व ५०४ प्रमाणे दि १२ मे रोजी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे व अतुल वंजारी हे करीत आहे.


अटक व पोलीस कोठडीत  रवानगी


पोलिसांनी त्वरित दोन आरोपींना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले असता  मुख्य आरोपी हा अल्पवयीन निघाल्याने त्याला ५ दिवसासाठी रिमांड होम मध्ये पाठवण्यात आले तर दुसरा आरोपी दिनेश चौधरी यास  न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.


जुनेद ची प्रकृती स्थिर


ओम क्रिटिकल मध्ये ११मे पासून ऍडमिट असून त्याची प्रकृती स्थिर असून धोका अद्याप निघालेला नाही. डॉक्टर यांनी पुनश्च ४८तास ऑब्झर्वेशन मध्ये ठेवावे लागेल असे सांगितले आहे.