शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी उमेदवारी अँड. महेंद्र भावसार यांची पत्रकार परिषदेत माहिती.

 





शिक्षण क्षेत्रात शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून  त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर बाबीमध्ये काही बदल होणे आवश्यक आहे.हे बदल व्हावेत म्हणून शिक्षकांसाठी विधानपरिषदेत शिक्षकांचा आमदार प्रतिनिधी असावा म्हणून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी उमेदवारी करीत असल्याची भूमिका सुप्रसिद्ध विधिज्ञ अँड. महेंद्र भावसार यांनी  सोमवारी १३ मे  रोजी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. शिक्षण क्षेत्रात कशा प्रकारे शिक्षकांवर अन्याय केला जातो. शिक्षकांची काही चुक नसतानाही त्याला कसे कायदेशीर बाबींमध्ये अडकविले जाते. याबाबत अँड. भावसार यांनी काही उदाहरणे आणि दाखले देऊन सविस्तर स्पष्टीकरण दिले. कायद्यात कोणत्या त्रुटी आहेत आणि कायद्यातील कोणत्या कलमात कोणती दुरुस्ती  केल्यामुळे शिक्षकांवरील अन्याय दूर होईल याबाबत एक स्वतंत्र प्रबंध तयार करून तो शासानाकडेदेखील सादर केला.मात्र,त्यानंतरही  या दुरस्तीबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

वकिली क्षेत्रात आणि कायद्यात राहून शिक्षकांसाठी न्याय मिळवण्याचे कामकाज ३२ वर्षे केल्यानंतर असे निदर्शनास येते की ,मूलभूत कायद्यातच काही बदल आवश्यक आहे.तसेच कायदा बदलण्याचे काम हे न्यायव्यवस्थेचे नाही तर ते संसदेचे अथवा विधानभवनाचे काम आहे.म्हणूनच शिक्षकांवरील अन्याय मुळापासून दूर करण्यासाठी विधानभवनात प्रवेश करून कायद्याचे मूलभूत बदल घडवून आणावे , या उद्देशाने ३२ वर्षे शिक्षण क्षेत्रात वकिली केल्यानंतर विधान भवनात शिक्षकांच्या न्याय मागण्या आणि कायद्यातील मूलभूत बदल घडवून आणावे , या हेतूने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा माझा निर्णय आहे. यासाठीच राजकारणात प्रवेश करीत असल्याचे अँड.भावसार यांनी स्पष्ट केले.